सोमवार, २२ एप्रिल, २०१३

पुण्याची आन आणि शान


शभंर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेली पूणेरी पगडी ही विदवत्तेचं प्रतिक आहे. पुण्यात तर कार्यक्रमात मान्यवरांचा पुणेरी पगडी ने सत्कार करण्याची पध्दत आहे. पण आलिकडे हि पगडी फक्त बुध्दीजीवी वर्गा पुरती मर्यादित न राहाता सण समारंभात, कॉलेज डेजना, वाढदिवसाला पुणेरी पगडी घालण्याचा ट्रेन्ड आला आहे. परेशात पोहचलेली ही पुणेरी पगडी आता देवांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच घातली जाते. ग्लोबल झालेल्या या पगडीला जी.आय. प्रमाणपत्र ही मिळाले आहे. या प्रमाणपत्रामूळे पुणेरी पगडीच्या बैध्दिक संपदा हक्काचे सरंक्षण होणार आहे. पूणेरी पगडी ही पेशावाई, चक्री, अशा तीन ते चार प्रकारात उपलब्ध आहे. नाना फडणवीस, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळणूकर, लोकमान्य टिळक यांच्या पगड्या प्रसिध्द आहे. त्यातूनही लोकमान्य टिळकांच्या पगडीला जास्त मागणी आहे. पुणेरी पगडी बनवने आणि ती घालणे ही ऎक कलाच आहे. पूण्यातले मुरडकर झेंडेवाले गेल्या तीन पिढ्या पगडी बनवण्याच्या व्यवसायात आहे. पूणेरी पगडी मुख्यत: लाल रंगात येते. हव्या असलेल्या साइज आणि कलरमध्ये ही पगडी उपलब्ध होते. जवळपास ४० देशांमध्ये ही पुणेरी पगडी पोहचली असून राष्ट्रपती, मुख्यमंत्री या सारख्या मान्यवरांसाठी सन्मानासाठी खास पुणेरी पगड्या बनवल्या जातात. पूणेरी पगडीची किंमत ३०० रुपांयापासून ते ७०० रुपायांपर्यंत आहे. पूणेरी पगडीला ब्राम्हणी संस्कॄती म्हणूनही हिणवले जाते. विशिष्ट वर्गांची मक्ते दारी असलेली पूणेरी पगडी मध्यंतरीच्या काळात लोप पावण्याची भिती निर्माण झाली होती. पण नविन पिढी संस्कॄती म्हणून पुणेरी पगडी पुन्हा ऎकदा स्वीकारून पूणेरी पगडीला पुनर्जीवन दिले. हा बदल नक्कीच स्वागतार्ह्य असल्याचं मूरडकर झेंडेवाले यांनी सांगितलं. यामूळेच कॉलेज डेज आणि लग्नसराई यामुळे पून्हा ऎकदा या पुणेरी पगडी वरची धूळ झटकली जाऊन तिला नविन झळाळी मिळाली आहे.

PAITHANI

                                                           गर्भरेशमी पैठणी


पैठणी म्हणजे महाराष्ट्राचा गर्भरेशमी वस्त्र अलंकार. पैठणी न आवडणारी स्त्री तर शोधून ही सापडायची नाही. पुर्वीच्या काळी हे महावस्त्र राज घराण्यातील स्त्रीयांसाठी खास करून बनवली जायची. यात सोन्या चांदीची जर वापरली जायची. साड्या मध्ये पहिला मान पैठणीचाच. लग्नातही नववधूला शालू इतकीच भूरळ घालते ती पैठणी. वार्डरोब मध्ये कितीही स्टाईश आणि डिजानयर वेअर साड्या असल्या तरी पैठणी ही मस्ट आहे असं महिला वर्गाला वाटतच असतं. पण आजच्या माहागाईच्या जमान्यात सोन्या चांदीच्या जर असणारी पैठणी काही सामान्यांना परवडणारी नाही. म्हणूनच पैठणीच्या मूळ रुपाला धक्का न पोहचवता पैठणीच्या सामान्यांना परवडणाऱ्या आवॄत्या आल्या पण याची किंमत साडेतीन हजारांच्या पुढे. पण म्हणतात हौशेला मोल नाही या उक्तीनुसार ज्यांच्या त्याच्या खिशाच्या ऎपतीनुसार या पैठण्यांचा ट्रेन्ड कायम ईन आहे. फरक इतकाच की, सोन्या, चांदिच्या जरी ऎवजी यात पॅलस्टिकची जर वापरली गेली. तसही पैठणीत सोन्या,चांदीची जर वापरून खास पैठणी बनवणारा सुखवस्तू वर्ग ही आहे.
आज या पैठण्यांमध्ये असंख्य प्रकार आणि रंग उपलब्ध आहेत. नारळी गोफ काठपदर आणि ६ मोरांची जोडी असणारी पारंपारिक पैठणीत ८०० ग्रम प्यूअर सिल्क वापरले जाते. या पैठणीचा पदर उलट्या बाजूने ही सारखाच दिसतो. ही ख्रऱ्या पैठणीची ओळख. डबल पल्लू ही जरा पैठणीतली वरची रेंज यावर १४ मोरांची जोडी असते. जर उत्कृष्ट असून जरीत एकसंधपणा असतो. या पैठणीची किंमत ५६५० इतकी आहे. याशिवाय ३६ मोर पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, झाबरा लोटस पैठणी असे अनेक प्रकार उपलब्ध आहे. नऊ किंवा पाच पाकळी लोटस, उमा परिंदा, तोता मैना नक्षी काम असलेल्या पैठणींना ही मागणी आहे. यात रंगसंगती ग्राहाकांच्या आवडीनिवडी नुसार ठरवले जातात. बालगंधर्व आणि शाही पैठणी तर नावासारख्याच. पिसारा फुलवलेल्या ३० मोरांची जोडी, मोरांची वेलबूट्टी आणि आकर्षक रंगसंगती यामुळे बालगंधर्व पैठणी बघता क्षणी नजरेत भरणारी. या पैठणी ची किंमत आहे सात हजार रुपये. शाही पैठणी तर खरोखरीच शाही आहे चक्रपल्लू असलेली ही पैठणी पेशवे घरण्यातील स्त्रीयांची खास आवडती पैठणी. या पैठणीची किंमत सधारण १० हजाराच्या आसपास आहे. याशिवाय काही लाखांच्या घरातल्या पैठण्याही आहेत.

 पैठणीतले शेले.
सध्या वेगवेगळ्या डिजाईन्सच्या स्टोल्स ची फॅशन ईन आहे. पण त्यातून पैठणीतल्या शेल्यांची बात काही न्यारीच. हा शेला स्टोल म्हणून किंवा ओढणी म्हणून ही वापरता येतो. या शेल्यांची तरूणींमध्ये क्रेज आहे. जीन्स वर स्टोल म्हणून तर सलवार कमीज वर ओढणी म्हणून या शेल्यांचा वापर करता येतो यामुळे कॉलेज डेज आणि फक्शन्सा हा शेला ट्रेन्डी लुकबरोबरच ट्रडिशनल लूक नक्कीच देतो. या पैठणीच्या शेल्यांची किंमत आहे १८५० याशिवाय सॅटिनचे शेले आहे. १० ते १२ रंग यात उबलब्ध आहे. सॅटिनच्या शेल्यांची किंमत आहे. ३७५ रुपये. याशिवाय पारंपारिक पैठणीचे ड्रेस मटेरियलही आलेले आहेत. या ड्रेस मटेरियलची किंमत जवळ पास ५०००च्या घरात आहे. तरूण वर्ग याकडे जास्त वळताना दिसतो.

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

MAHASHEER


              पाण्यातली वाघीण - महाशीर


निसर्गाचा समोतल साधण्यासाठी सर्वच नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता असते. यातली एकही गोष्ट दुर्मिळ झाली तरी निर्माण होणारी संकटं आपण पाहतच आहोत. असंच काहीस घडलं महाशीर माशांच्या बाबतीत. वाढते शहरीकरण, प्रदुषण आणि अवैध मासेमारी यामूळे ८०च्या दशकात इद्रांयणी नदीतला महाशीर मासा दुर्मिळ झाला होता. आज भारतातच नव्हे तर इतर देशातही महाशीर माश्यांची पैदास आणि संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात आहे. भारतात ही अनेक राज्यांमध्ये महाशीर च्या मासेमारीवर निर्बंध घातले गेले आहेत. महाशीर अर्थात देवमासा. देहुत आलेले भाविक इद्रांयणी नदीपात्रातल्या या माशाचं दर्शन घेतल्या शिवाय माघारी परतत नसत. परंतू ८० च्या दशकात नदीतलं महाशीर चं अस्तित्व नामशेष झालं होतं. परंतू केद्रींय मत्स्यकीय संस्था आणि तळेगावच्या फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेच्या पुढाकारानं इद्रांयणीत महाशीरला पुन्हा एकादा पुनरुज्वीन मिळालं.
                  या संस्थेने नदीत हे केवळ मासे सोडले नाही तर संवर्धन करण्याचं कठीण आव्हानं ही पार पेललं. त्यासाठी गावकऱ्यां मध्ये जनजागॄती करून मत्स्य क्रिडा पर्यटानाच्या नव्या संधी विषयी माहीती दिली. देवस्थानच्या माध्यामातून सर्कुलर काढून या माशांच्या अवैध मासेमारीवर लगाम घातला. या संस्थेने २०११ साली नदीपात्रात सोडलेले मासे आता दीड फूटांइतके वाढले आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा या देवमाश्याचं दर्शन होऊ लागलंं आहे. या माशांची पैदास केल्यानंतर त्याचं संवर्धन करणं ही तितकाच कठीण. फ्रेन्ड्स ऑफ नेचरचे संस्थापक सदस्य महेश महाजन म्हणाले पाण्यातलं तापमान नियंत्रीत करणं, नायट्रोजन, फॉसफरस ची मात्रा त्याबरोबरच त्यांचे खाद्य या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. यामध्ये थोडीशी गडबड झाली तरी या माशांना धोका उतप्न्न होऊ शकतो. म्हणूनच बाहेरून मागवलेल्या महाशीरच्या पिल्लांसाठी या संस्थेने विशेष टॅन्क तयार केले आहेत. तिथे ८ ते ९ इंचाचे हे मासे झाल्यानंतर त्यांना नदीत सोडले जातं. नदीतही काही अंतरापर्यंत विषेश योजना करण्यात आल्या आहे. लोखंडी जाळ्या. पिंजरे याद्वारे नदीतही काही काळ या माशांना संरक्षण पुरवलं जातंय.

महाशीर हा मासा पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे. तीतोपीलीया या नाशकारी माशाच्या प्रजातीवरही हा मासा नियंत्रण ठेवतो. या बरोबरच हा मासा गेम फिश म्हणून ही ओळखला जातो. कावेरी, शरयू, रामगंगा या नदी पात्रातील महशीरचे अ‍ॅग्लींग जगप्रसिध्द आहे. अ‍ॅग्लिंग हा मत्स्य क्रिडा पर्यटनाचा प्रकार आहे. यात वेगवेळ्या क्लृपत्या वापरून, विशिष्ट आवाज काढून कलात्मकरित्या माश्यांना पकडलं जातं आणि पुन्हा परत पाण्यात सोडून दिलं जातं. महाशीर मासा अतिशय चपळ आणि सामर्थवान म्हणून ओळखला जातो. म्हणुनच महाशीर ला पाण्यातली वाघीण म्हणतात. विदेशी पर्यटकांना तसेच अ‍ॅग्लर्सचा महाशीर आवडता मासा आहे. अशाप्रकारचे अ‍ॅग्लींग इदांयणी नदीपात्रात ही सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत जेणेकरूण आसपासच्या गावांना रोजगार मिळू शकतो.
विदेशी पर्यटक खास अग्लिंग साठीही भारतात येतात

या माशांची पैदास हाही तितकाच महत्तवाचा मुद्दा आहे. टाटा पावर हाऊस च्या लोणावळा इथल्या वळवण गार्डन इथे कूत्रिमरितीने या माशांची पैदास केली जाते. ही पध्द्त यशस्वी करण्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ शशांक ओगले यांचा मोलाचा वाटा आहे. गेली ३० कार्यरत असलेल्या टाटा पावर हाऊसच्या मत्स्य संवर्धन विभागात दरवर्षी ३ ते ४ लाख पिल्लांची पैदास केली जाते. अधुनिक पध्द्तींचा वापर करून मत्सबीजांचे फलन केले जाते आणि त्यांनतर तयार झालेली पिल्ले काही काळानंतर धरणात आणि नद्यांमध्ये सोडली जातात. या माश्यांची अंडी इतर मासे खात असल्याने त्यांची नैसर्गिक पैदाशीचे प्रमाण केवळ ३५% आहे परंतू कॄत्रिमरित्या पैदास होण्याचा प्रमाण ६५% आहे. यामूळे या माशांना पुन्हा एकदा पुनरुज्जीवन मिळण्यास मोठा फायदा होत आहे असं टाटा पावर हाऊसचे विवेक विश्वासराव म्हणाले.



               महाशीर याचा अर्थ मोठं डोकं असा होता. आपल्याकडे दख्खन महाशीर आणि गोल्डन महाशीर हे महाशीर चे प्रकार आढ्ळतात. हा मासा ७ ते ८ फुट लांबीचा असून त्याचं वजन ५० ते ६० किलो असतो. हा मासा २० ते २५ वर्ष जगतो. महाशीर हा मासा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळतो. हा मासा देव मासा म्हणुनही ओळखला जातॊ. या मशाल नवस ही बोलले जातात. केवळ भारतातच नाही थायलंड, मलेशिया याही देशांत या माश्याला दैवी महत्तव आहे.



हा लेख सामना मध्ये प्रसिध्द झाला आहे. महाजालावरील वाचक मित्र मैत्रिणी साठी पुन्हा इथे देत आहे