मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

MAHASHEER


              पाण्यातली वाघीण - महाशीर


निसर्गाचा समोतल साधण्यासाठी सर्वच नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता असते. यातली एकही गोष्ट दुर्मिळ झाली तरी निर्माण होणारी संकटं आपण पाहतच आहोत. असंच काहीस घडलं महाशीर माशांच्या बाबतीत. वाढते शहरीकरण, प्रदुषण आणि अवैध मासेमारी यामूळे ८०च्या दशकात इद्रांयणी नदीतला महाशीर मासा दुर्मिळ झाला होता. आज भारतातच नव्हे तर इतर देशातही महाशीर माश्यांची पैदास आणि संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात आहे. भारतात ही अनेक राज्यांमध्ये महाशीर च्या मासेमारीवर निर्बंध घातले गेले आहेत. महाशीर अर्थात देवमासा. देहुत आलेले भाविक इद्रांयणी नदीपात्रातल्या या माशाचं दर्शन घेतल्या शिवाय माघारी परतत नसत. परंतू ८० च्या दशकात नदीतलं महाशीर चं अस्तित्व नामशेष झालं होतं. परंतू केद्रींय मत्स्यकीय संस्था आणि तळेगावच्या फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेच्या पुढाकारानं इद्रांयणीत महाशीरला पुन्हा एकादा पुनरुज्वीन मिळालं.
                  या संस्थेने नदीत हे केवळ मासे सोडले नाही तर संवर्धन करण्याचं कठीण आव्हानं ही पार पेललं. त्यासाठी गावकऱ्यां मध्ये जनजागॄती करून मत्स्य क्रिडा पर्यटानाच्या नव्या संधी विषयी माहीती दिली. देवस्थानच्या माध्यामातून सर्कुलर काढून या माशांच्या अवैध मासेमारीवर लगाम घातला. या संस्थेने २०११ साली नदीपात्रात सोडलेले मासे आता दीड फूटांइतके वाढले आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा या देवमाश्याचं दर्शन होऊ लागलंं आहे. या माशांची पैदास केल्यानंतर त्याचं संवर्धन करणं ही तितकाच कठीण. फ्रेन्ड्स ऑफ नेचरचे संस्थापक सदस्य महेश महाजन म्हणाले पाण्यातलं तापमान नियंत्रीत करणं, नायट्रोजन, फॉसफरस ची मात्रा त्याबरोबरच त्यांचे खाद्य या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. यामध्ये थोडीशी गडबड झाली तरी या माशांना धोका उतप्न्न होऊ शकतो. म्हणूनच बाहेरून मागवलेल्या महाशीरच्या पिल्लांसाठी या संस्थेने विशेष टॅन्क तयार केले आहेत. तिथे ८ ते ९ इंचाचे हे मासे झाल्यानंतर त्यांना नदीत सोडले जातं. नदीतही काही अंतरापर्यंत विषेश योजना करण्यात आल्या आहे. लोखंडी जाळ्या. पिंजरे याद्वारे नदीतही काही काळ या माशांना संरक्षण पुरवलं जातंय.

महाशीर हा मासा पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे. तीतोपीलीया या नाशकारी माशाच्या प्रजातीवरही हा मासा नियंत्रण ठेवतो. या बरोबरच हा मासा गेम फिश म्हणून ही ओळखला जातो. कावेरी, शरयू, रामगंगा या नदी पात्रातील महशीरचे अ‍ॅग्लींग जगप्रसिध्द आहे. अ‍ॅग्लिंग हा मत्स्य क्रिडा पर्यटनाचा प्रकार आहे. यात वेगवेळ्या क्लृपत्या वापरून, विशिष्ट आवाज काढून कलात्मकरित्या माश्यांना पकडलं जातं आणि पुन्हा परत पाण्यात सोडून दिलं जातं. महाशीर मासा अतिशय चपळ आणि सामर्थवान म्हणून ओळखला जातो. म्हणुनच महाशीर ला पाण्यातली वाघीण म्हणतात. विदेशी पर्यटकांना तसेच अ‍ॅग्लर्सचा महाशीर आवडता मासा आहे. अशाप्रकारचे अ‍ॅग्लींग इदांयणी नदीपात्रात ही सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत जेणेकरूण आसपासच्या गावांना रोजगार मिळू शकतो.
विदेशी पर्यटक खास अग्लिंग साठीही भारतात येतात

या माशांची पैदास हाही तितकाच महत्तवाचा मुद्दा आहे. टाटा पावर हाऊस च्या लोणावळा इथल्या वळवण गार्डन इथे कूत्रिमरितीने या माशांची पैदास केली जाते. ही पध्द्त यशस्वी करण्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ शशांक ओगले यांचा मोलाचा वाटा आहे. गेली ३० कार्यरत असलेल्या टाटा पावर हाऊसच्या मत्स्य संवर्धन विभागात दरवर्षी ३ ते ४ लाख पिल्लांची पैदास केली जाते. अधुनिक पध्द्तींचा वापर करून मत्सबीजांचे फलन केले जाते आणि त्यांनतर तयार झालेली पिल्ले काही काळानंतर धरणात आणि नद्यांमध्ये सोडली जातात. या माश्यांची अंडी इतर मासे खात असल्याने त्यांची नैसर्गिक पैदाशीचे प्रमाण केवळ ३५% आहे परंतू कॄत्रिमरित्या पैदास होण्याचा प्रमाण ६५% आहे. यामूळे या माशांना पुन्हा एकदा पुनरुज्जीवन मिळण्यास मोठा फायदा होत आहे असं टाटा पावर हाऊसचे विवेक विश्वासराव म्हणाले.



               महाशीर याचा अर्थ मोठं डोकं असा होता. आपल्याकडे दख्खन महाशीर आणि गोल्डन महाशीर हे महाशीर चे प्रकार आढ्ळतात. हा मासा ७ ते ८ फुट लांबीचा असून त्याचं वजन ५० ते ६० किलो असतो. हा मासा २० ते २५ वर्ष जगतो. महाशीर हा मासा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळतो. हा मासा देव मासा म्हणुनही ओळखला जातॊ. या मशाल नवस ही बोलले जातात. केवळ भारतातच नाही थायलंड, मलेशिया याही देशांत या माश्याला दैवी महत्तव आहे.



हा लेख सामना मध्ये प्रसिध्द झाला आहे. महाजालावरील वाचक मित्र मैत्रिणी साठी पुन्हा इथे देत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा