सोमवार, २२ एप्रिल, २०१३

PAITHANI

                                                           गर्भरेशमी पैठणी


पैठणी म्हणजे महाराष्ट्राचा गर्भरेशमी वस्त्र अलंकार. पैठणी न आवडणारी स्त्री तर शोधून ही सापडायची नाही. पुर्वीच्या काळी हे महावस्त्र राज घराण्यातील स्त्रीयांसाठी खास करून बनवली जायची. यात सोन्या चांदीची जर वापरली जायची. साड्या मध्ये पहिला मान पैठणीचाच. लग्नातही नववधूला शालू इतकीच भूरळ घालते ती पैठणी. वार्डरोब मध्ये कितीही स्टाईश आणि डिजानयर वेअर साड्या असल्या तरी पैठणी ही मस्ट आहे असं महिला वर्गाला वाटतच असतं. पण आजच्या माहागाईच्या जमान्यात सोन्या चांदीच्या जर असणारी पैठणी काही सामान्यांना परवडणारी नाही. म्हणूनच पैठणीच्या मूळ रुपाला धक्का न पोहचवता पैठणीच्या सामान्यांना परवडणाऱ्या आवॄत्या आल्या पण याची किंमत साडेतीन हजारांच्या पुढे. पण म्हणतात हौशेला मोल नाही या उक्तीनुसार ज्यांच्या त्याच्या खिशाच्या ऎपतीनुसार या पैठण्यांचा ट्रेन्ड कायम ईन आहे. फरक इतकाच की, सोन्या, चांदिच्या जरी ऎवजी यात पॅलस्टिकची जर वापरली गेली. तसही पैठणीत सोन्या,चांदीची जर वापरून खास पैठणी बनवणारा सुखवस्तू वर्ग ही आहे.
आज या पैठण्यांमध्ये असंख्य प्रकार आणि रंग उपलब्ध आहेत. नारळी गोफ काठपदर आणि ६ मोरांची जोडी असणारी पारंपारिक पैठणीत ८०० ग्रम प्यूअर सिल्क वापरले जाते. या पैठणीचा पदर उलट्या बाजूने ही सारखाच दिसतो. ही ख्रऱ्या पैठणीची ओळख. डबल पल्लू ही जरा पैठणीतली वरची रेंज यावर १४ मोरांची जोडी असते. जर उत्कृष्ट असून जरीत एकसंधपणा असतो. या पैठणीची किंमत ५६५० इतकी आहे. याशिवाय ३६ मोर पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, झाबरा लोटस पैठणी असे अनेक प्रकार उपलब्ध आहे. नऊ किंवा पाच पाकळी लोटस, उमा परिंदा, तोता मैना नक्षी काम असलेल्या पैठणींना ही मागणी आहे. यात रंगसंगती ग्राहाकांच्या आवडीनिवडी नुसार ठरवले जातात. बालगंधर्व आणि शाही पैठणी तर नावासारख्याच. पिसारा फुलवलेल्या ३० मोरांची जोडी, मोरांची वेलबूट्टी आणि आकर्षक रंगसंगती यामुळे बालगंधर्व पैठणी बघता क्षणी नजरेत भरणारी. या पैठणी ची किंमत आहे सात हजार रुपये. शाही पैठणी तर खरोखरीच शाही आहे चक्रपल्लू असलेली ही पैठणी पेशवे घरण्यातील स्त्रीयांची खास आवडती पैठणी. या पैठणीची किंमत सधारण १० हजाराच्या आसपास आहे. याशिवाय काही लाखांच्या घरातल्या पैठण्याही आहेत.

 पैठणीतले शेले.
सध्या वेगवेगळ्या डिजाईन्सच्या स्टोल्स ची फॅशन ईन आहे. पण त्यातून पैठणीतल्या शेल्यांची बात काही न्यारीच. हा शेला स्टोल म्हणून किंवा ओढणी म्हणून ही वापरता येतो. या शेल्यांची तरूणींमध्ये क्रेज आहे. जीन्स वर स्टोल म्हणून तर सलवार कमीज वर ओढणी म्हणून या शेल्यांचा वापर करता येतो यामुळे कॉलेज डेज आणि फक्शन्सा हा शेला ट्रेन्डी लुकबरोबरच ट्रडिशनल लूक नक्कीच देतो. या पैठणीच्या शेल्यांची किंमत आहे १८५० याशिवाय सॅटिनचे शेले आहे. १० ते १२ रंग यात उबलब्ध आहे. सॅटिनच्या शेल्यांची किंमत आहे. ३७५ रुपये. याशिवाय पारंपारिक पैठणीचे ड्रेस मटेरियलही आलेले आहेत. या ड्रेस मटेरियलची किंमत जवळ पास ५०००च्या घरात आहे. तरूण वर्ग याकडे जास्त वळताना दिसतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा